Jagatguru Swami Rambhadracharya Maharaj : मंदिरांच्या सूत्रांवर आपला संघर्ष चालूच रहाणार !
संभल (उत्तरप्रदेश) येथील मंदिरे सापडल्याच्या घटनांवर जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांचे विधान
नवी देहली – उत्तरप्रदेशातील संभलमध्ये जे काही चालू आहे ते अत्यंत वाईट आहे; मात्र यात एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे होय. आम्ही हे मंदिर परत मिळवणारच; मग ते मतांच्या माध्यमाने असो, न्यायालयाच्या माध्यमाने असो अथवा जनतेच्या सहकार्याने असो. मंदिरांच्या सूत्रांवर आपला संघर्ष चालूच रहाणार आणि यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार, असे विधान जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी केले.
मंदिर-मशीद यांच्या संदर्भातील सरसंघचालकांच्या वक्तव्याशी मी अजिबात सहमत नाही !
‘मंदिर-मशीद वादातून काही लोक हिंदूंचे नेते बनत आहेत’, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, सरसंघचालकांच्या वक्तव्याशी मी अजिबात सहमत नाही. सरसंघचालक शिस्तप्रिय आहेत; पण या संदर्भात त्यांच्या मतांशी मी सहमत नाही.
बांगलादेशातील घटनांविषयी प्रतीक्षा करा, सर्वांचा नाश होईल, काळजी करू नका !
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले की, बांगलादेशाचे अंतरिम सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे. बांगलादेशाचे अंतरिम पंतप्रधान ‘दुष्ट’ आहेत. प्रतीक्षा करा, सर्वांचा नाश होईल. काळजी करू नका. बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायानेही गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे. आम्ही सरकारला बरेच काही सांगितले आहे; परंतु ही समस्या केवळ भारत सरकारसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी हा चिंतेचा विषय आहे.
संपादकीय भूमिकामंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे ! |