सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी लक्षात आलेली सूत्रे
१. सनातन संस्थेची कार्यपद्धत अन् हेतू ‘व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रति समर्पण भाव शिकवणे’, हा आहे, तसेच ‘तिला देवाचे अधिष्ठान आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. अनेक धार्मिक संस्था (प्रतिष्ठान) व्यक्तीचे प्रापंचिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी तात्पुरते मार्गदर्शन करतांना दिसतात, तर ‘सनातन संस्था ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवते.
३. ‘गुरुकृपायागोनुसार साधना म्हणजे काय ?, व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं दूर केला नाही; गुणसंवर्धन केले नाही, तर त्याला चिरंतन आनंद, म्हणजेच ईश्वर मिळणार नाही’, हे शास्त्रीय पद्धतीने पटवून देणारी परात्पर गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) शिकवण अतिशय महत्त्वाची आहे.
४. समष्टी सेवा करतांना मला अनेकदा नकारात्मकता यायची; पण एखाद्या साधकाचा भ्रमणभाष यायचा आणि मार्ग मिळून जायचा, ही एक अनुभूतीच आहे’, हे नंतर माझ्या लक्षात यायचे. ‘गुरुदेव साधकांच्या माध्यमातून स्वतःच माझ्याशी संपर्क करून माझ्या अडचणी दूर करत आहेत’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली.’
– श्री. वैभव बाळकृष्ण पावसकर, चिंचवड, पुणे. (२६.४.२०२३)