२४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा येथे होत असलेल्या मंदिर परिषदेची सिद्धता अंतिम टप्प्यात !

अहिल्यानगर येथे मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी यांना विषय सांगतांना मान्यवर

शिर्डी – २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे होत असलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे. हे अधिवेशन जिथे होत आहे, तेथील सभागृहाच्या खाली स्वागत कमान लावण्यात आलेली आहे. सभागृहातही भव्य असा वैशिष्ट्यपूर्ण फलक लावण्यात आला आहे.

मंदिर परिषदेच्या बाहेर लावण्यात आलेली स्वागत कमान

या संदर्भात मंदिर परिषदेचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेसाठी १ सहस्रांहून अधिक विश्वस्तांची नोंदणी झाली आहे. विश्वस्त, प्रतिनिधी यांच्याकडे परिषदेला येण्यासाठी प्रचंड उत्साह जाणवत असून अनेक जण गाड्या करून २३ डिसेंबर या दिवशी सकाळीच निघणार आहेत.’’

संभाजीनगर येथे मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी यांना परिषदेचा विषय सांगतांना श्री. सुनील घनवट

विशेष

१. श्री पालखी निवाराच्या एल्.ई.डी. स्क्रीनवर मंदिर महासंघाच्या तृतीय मंदिर परिषदेचे विज्ञापन दाखवण्यात येत आहे. या माध्यमातून येथे येणारे अनेक भाविक, तसेच मुंबई, संभाजीनगर येथून जे भाविक ‘साई पालख्या’ घेऊन येत आहेत, त्यांच्यापर्यंतही विषय पोचायला साहाय्य होत आहे.

२. राज्यभरात विविध ठिकाणी मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी यांच्या भेटी, संपर्क अभियान यांद्वारे परिषदेसाठी संपर्क अंतिम टप्प्यात असून सगळ्यांमध्ये परिषदेसाठी उत्साह जाणवत आहे !