हत्येसाठी गुरांची वाहतूक करणार्या दोघांना अटक
बोलेरो गाडीसह ३ गुरे पोलिसांच्या कह्यात
सावंतवाडी – हत्येसाठी गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी मेहरूझ युसुफ नाईक आणि महंमद सादीक मेहरूझ नाईक (दोघेही रहाणार भुदरगड, कोल्हापूर) यांना पोलिसांनी तालुक्यातील पेडवेवाडी, कारिवडे येथे २१ डिसेंबरला रात्री अटक केली. या वेळी पोलिसांनी बोलेरो गाडी आणि ३ गुरे कह्यात घेतली. पोलीस हवालदार रामदास जाधव यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.