हसापूर (गोवा) येथील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमानांना दुकाने लावण्यास देवस्थान समितीकडून बंदी
पेडणे, २२ डिसेंबर (वार्ता.) – हसापूर-चांदेल क्षेत्रातील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमान व्यापार्यांना व्यवसाय करण्यास अनुमती देणार नाही, असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. २२ डिसेंबर या दिवशी सातेरी देवतेची जत्रा झाली. या जत्रेत देवस्थान समितीने मुसलमानांना जत्रेत दुकाने लावण्यास बंदी घातली. या जत्रेच्या आधी काही जणांनी हिंदूंना जागृत करणारे फलक लावले होते. ‘सण हिंदूंचे, खरेदी हिंदूंकडूनच करूया !, ‘हसापूर गावातील आणि अन्य हिंदु धार्मिक कार्यक्रमांत जिहाद्यांना दुकाने लावण्यास बंदी’, ‘थुक जिहाद, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, वोट जिहाद, वक्फ बोर्ड इत्यादींपासून सावध रहा’, असे फलक लावण्यात आले होते.
देवस्थानच्या महाजनांच्या बैठकीत ‘मुसलमान व्यापार्यांना स्टॉल लावायला देऊ नये’, असा निर्णय घेतला असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष मळीक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशभरात हिंदूंचा एक उपक्रम चालू आहे, त्याला पाठिंबा देत आम्ही हा निर्णय घेतला आहे. आजच नव्हे, तर यापुढे हिंदूंचे सण, उत्सव, जत्रा होतात, त्या वेळी मुसलमानांना एकही स्टॉल लावू दिला जाणार नाही.’’ एक महाजन म्हणाले, ‘‘फातर्पा येथील जत्रेमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे.’’ देवस्थानचे महाजन
डॉ. भिवा लाडू मळीक म्हणाले, ‘‘गोव्यातील सर्व देवस्थान समित्यांनी अशा प्रकारचा निर्णय घ्यावा.’’