देहलीत बेकायदेशीरपणे रहाणारे १७५ बांगलादेशी घुसखोर सापडले !
नवी देहली – वैध भारतीय कागदपत्रांखेरीज देहलीतल रहाणार्या बांगलादेशी स्थलांतरितांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी मोहीम चालू केली आहे. बेकायदेशीरपणे रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस घरोघरी जाऊन शोध घेत आहेत. देहलीच्या बाहेरील जिल्ह्याच्या हद्दीत रहाणारे १७५ व्यक्ती संशयीत म्हणून सापडले आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून त्याच्या कागदपत्रांचीही बारकाईने तपासणी व पडताळणी करण्यात आली आहे. संबंधित भागातील स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून त्यांची ओळख पडताळण्यासाठी पथके त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना तात्काळ बांगलादेशात हाकलून द्या ! |