काँग्रेसच्या खासदारांची गुंड वृत्ती !
‘संसद भवन परिसरात १९ डिसेंबर २०२४ या दिवशी सकाळी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेत भाजपचे खासदार प्रताप सिंह सारंगी आणि मुकेश राजपूत घायाळ झाले. खासदार सारंगी यांनी ‘मला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली आणि त्यामुळे मी खाली पडलो अन् माझ्या डोक्याला मार लागला’, असा आरोप केला. राहुल गांधी यांनी हा आरोप फेटाळत भाजपच्या खासदारांनीच त्यांना संसद भवनाच्या मकर द्वारातून प्रवेश करण्यापासून रोखतांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.’
(२०.१२.२०२४)