प्रपंचाचा वीट आल्याविना देवाची भेट नाही !
एकाने विचारले, ‘पुंडलिकाने वीट फेकली आणि त्यावर विठ्ठलास उभे केले. यात विटेचे प्रयोजन काय ? ‘तसाच उभा रहा’, असे विठ्ठलास सांगता आले असते.’ श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘प्रपंचाचा वीट आल्याविना विठ्ठलाची भेट होत नाही, हे दाखवण्यासाठी पांडुरंग विटेवर उभा आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)