Ishtiaq Ahmad On Jinnah : पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांनी कट्टरतावादाचा अवलंब केला ! – पाकिस्तानी लेखकाचा मोठा खुलासा
इस्लामाबाद – पाकिस्तानी वंशाचे स्विडिश शास्त्रज्ञ आणि लेखक इश्तियाक अहमद यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना हे कधीच लोकशाहीवादी नव्हते. इश्तियाद अहमद यांनी भारत-पाकिस्तान फाळणीविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी जिना यांच्या जीवनातील आणि विचारसरणीच्या काही पैलूंवर प्रकाश टाकला आहे. जिना यांनी कट्टरतावादाचा अवलंब केला आणि पाकिस्तान इस्लामी देश बनण्याविषयी विधाने केली होती. जिना धर्मनिरपेक्ष नेते नव्हते, तर कट्टरवादी होते, असे इश्तियाक अहमद यांनी एका मुलाखतीत सांगितले.
इश्तियाक अहमद पुढे म्हणाले,
१. पाकिस्तानची निर्मिती करण्यात जिना यशस्वी झाले. भारताची फाळणी सोपी गोष्ट नव्हती; पण नेहरू, गांधी आणि मौलाना आझाद यांसारख्या नेत्यांना स्वतःच्या बाजूने वळवून त्यांनी ते केले. यावरून त्यांचा भडक स्वभाव दिसून येतो.
२. फाळणीच्या वेळी जिना यांनी धर्मांध कारवाया केल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला.
३. पाकिस्तानची मागणी लावून धरण्यासाठी जिना यांनी मोठ्या प्रमाणात मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) आंदोलनामध्ये सहभागी करून घेतले.
४. ‘जो पाकिस्तानच्या बाजूने मतदान करणार नाही, त्यांचे संसार मोडले जातील. अशांच्या अंतयात्रेला शेवटचे नमाजपठण केले जाणार नाही’, असे फतवे त्या वेळी मौलवींनी काढले होते.
५. पाकिस्तानने जिना यांच्या विचारांचा अवलंब केल्यामुळेच तेथे लोकशाही रुजली नाही.
संपादकीय भूमिकावास्तविक यात नवीन असे काहीच नाही. फाळणीच्या वेळी हिंदूंवर जे अन्याय-अत्याचार झाले, त्यांना न्याय कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे ! |