Bangladesh Commission : (म्हणे) ‘भारताने आमच्या लोकांना बेपत्ता केले !’

बांगलादेश सरकारचा भारतावर आरोप

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांच्या राजवटीत बांगलादेशातून लोकांना बेपत्ता करण्यात भारताचा हात असल्याचा आरोप अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मैनुल इस्लाम चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगामध्ये ५ सदस्यांचा समावेश होता.

१. निवृत्त न्यायाधीश मैनुल इस्लाम चौधरी म्हणाले की, आम्ही मंत्रालयांना विनंती करतो की, त्यांनी भारतीय कारागृहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आयोगाला बांगलादेशाच्या बाहेरची माहिती घेणे शक्य नाही.

२. आयोगाने २ प्रकरणांची माहिती दिली आहे. पहिले प्रकरण शुक्रमंजन बाली यांचे असून त्यांचे बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातून अपहरण करण्यात आले होते आणि नंतर ते भारतीय कारागृहात सापडले. दुसरे प्रकरण होते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी नेते सलाउद्दीन अहमद यांचे आहे.

३. आयोगाचे सदस्य आणि मानवाधिकार कार्यकर्ते सज्जाद हुसेन म्हणाले की, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेखेरीज बेपत्ता झाल्याच्या १ सहस्र ६७६ तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यांपैकी ७५८ चे अन्वेषण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाच्या उलट्या बोंबा !