Kanpur 5 Temples Freed Out of 120 : कानपूरमध्ये मुसलमानबहुल भागात बंद आणि अतिक्रमित आहेत १२० मंदिरे !
महिला महापौरांनी ५ मंदिरे केली अतिक्रमणमुक्त
कानपूर (उत्तरप्रदेश) – शहराच्या महापौर प्रमिला पांडे यांनी राज्यात संभल, बरेली आणि अलीगड येथील मुसलमानबहुल भागात बंद असणारी हिंदु मंदिरे सापडल्यानंतर शहरातील मुसलमानबहुल भागांमध्ये जाऊन तपासणी चालू केली. त्यांनी या ठिकाणी ५ मंदिरे बंद आणि जीर्ण अवस्थेत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी बिर्याणी विक्रीची दुकानेही थाटण्यात आली होती. आता येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून स्वच्छता चालू करण्यात आली आहे. तसेच येथे प्रतिदिन पूजा करण्यासही प्रारंभ करण्यात आले आहे. शहरात अशा मंदिरांची संख्या १२० हून अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
The Kanpur BJP mayor, Pramila Pandey, has taken a commendable step by freeing 5 temples from encroachment in Mu$l!m dominated areas. 🛕
However, there’s still a long way to go, as 120 temples in these areas remain closed and encroached
It’s surprising that the police,… pic.twitter.com/t1JFHR6mC7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 22, 2024
१. २१ डिसेंबर या दिवशी महापौर प्रमिला पांडे पोलीस दलासह मुसलमानबहुल बेकनगंजमध्ये पोचल्या. येथे जून २०२२ मध्ये भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबराच्या संदर्भातील कथित अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ मुसलमानांनी पोलिसांवर आक्रमण केले होते. येथील अनेक मंदिरांत अवैध धंदे चालू असल्याची माहिती प्रमिला पांडे यांना मिळाली होती.
बेकनगंज सुनार वाली गली में मंदिरों का निरीक्षण किया.यहां कई मंदिरों में पूरी तरह से अवैध कब्जे कर निर्माण कर लिया गया है और मूर्तियां गायब कर दी गई हैं.यहां पर मैंने सभी कब्जेदारों को कहा कि मंदिरों को खाली करना पड़ेगा.. pic.twitter.com/6jyaU2LcVt
— Pramila Pandey ( मोदी का परिवार) (@mayorkanpur) December 21, 2024
२. अवघ्या ३० मिनिटांत प्रमिला पांडे यांनी अशी एकूण ५ मंदिरे शोधून काढली जी बेकायदेशीर धंदे आणि जीर्ण स्थितीत असल्याचे आढळून आले. यामध्ये राम जानकी मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे. हे मंदिर कानपूर येथे वर्ष २०२२ च्या हिंसाचारातील मुख्य आरोपी मुख्तार बाबा बिर्याणीवाले याच्या कह्यात होते. मंदिराच्या मागे बिर्याणी बनवली जात होती. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार १०० स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेल्या या मंदिराचा आता केवळ थोडासाच भाग उरला आहे.
३. दुसरे मंदिर राधाकृष्णाचे आहे. हे मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत सापडले. या परिसरात महादेव शिवाचे तिसरे मंदिर सापडले. मंदिरात शिवलिंगाचे केवळ अवशेष सापडले. मंदिराच्या मागे निवासी वस्ती आहे. शिवमंदिरानंतर महापौर आणि सोबतच्या प्रशासकीय पथकाला दुसरे राधाकृष्ण मंदिर सापडले. या मंदिराचे दार बंद असल्याचे आढळून आले. दार उघडले असता आत कचरा भरलेल्याचे आढळून आले. महापौर प्रमिला यांनी सर्व बेकायदा अतिक्रमणधारकांना तात्काळ त्यांचे नियंत्रण सोडण्याचा आदेश दिला.
४. सर्व मंदिरांचा शोध घेतल्यानंतर तेथे जीर्णाद्धार करून पूर्वीप्रमाणेच विधीप्रमाणे पूजा प्रारंभ केली जाईल, असे महापौरांनी जाहीर केले आहे. मंदिरातील मूर्ती कुठे गेल्या, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापौर पांडे यांनी सांगितले.
५. कानपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील मुसलमानबहुल भागात जवळपास १२० मंदिरे बंद आहेत. प्रशासनाच्या या कारवाईनंतर मुसलमानांनी अतिक्रमण करणारे नाही, तर मंदिरांचे रक्षक म्हणण्यास चालू केले आहे.
६. राम जानकी मंदिराच्या मागे रहाणारा नफीस याने याविषयी म्हटले की, तुम्ही मंदिर उघडू शकता. आमच्या त्याच्याशी काहीही संबंध नाही. मंदिर वेगळे, घर वेगळे आहे. हा परिसर पूर्वी जुना सराफा बाजार होता. येथे सर्व हिंदु बांधव रहात होते. नंतर ते हिंदूबहुल भागांत गेले. वर्ष १९९२ च्या दंगलीत सर्वत्र मंदिरांची तोडफोड झाली. त्या वेळी आम्ही या मंदिराचे रक्षण केले, असा दावा त्याने केला.
संपादकीय भूमिकाकानपूरच्या भाजपच्या महिला महापौरांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, तसेच राज्यांतील पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते निष्क्रीय का आहेत ? तेथील हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन मुसलमानबहुल भागांत बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! |