रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिवसेना

भरतशेठ गोगावले

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – रायगडचे पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असावे, असे मला वाटत आहे. कुठला विभाग मिळणार, हे आताच सांगू शकत नाही. माझ्या निवडीला तिन्ही पक्षांची हरकत नाही. तिन्ही नेत्यांनी बसून ठरवले आहे. खातेवाटप लवकरच घोषित होईल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी २१ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.