मुंबईतून बाहेर गेलेल्यांना सरकार मुंबईत घर देणार ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह जे प्रकल्प रखडले आहेत, जो मुंबईकर मुंबईतून बाहेर गेला आहे, त्याला पुन्हा मुंबई येथे घर देण्याचे काम ‘स्वयं-पुनर्विकास योजने’च्या माध्यमातून करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरसह सदस्यांनी केलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांच्या घरांविषयी महायुती सरकार संवेदनशील आहे. पोलीस वसाहती दुरवस्थेत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणार्या कुटुंबाची चिंता असता कामा नये, अशी भूमिका शासनाची आहे. एम्.एस्.आर्.डी.सी, एम्.आय.डी.सी, एस्.आर्.ए, म्हाडा, बी.एम्.सी., सिडको या सर्व योजना एकत्र करून एजन्सी केली जाईल.