सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात मासेमारी यांत्रिक नौका बुडाली

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रातील खडकाळ भागात २० डिसेंबर या दिवशी रात्री राजकोट (मालवण) येथील सुनील खंदारे यांची यांत्रिक मासेमारी नौका (ट्रॉलर) बुडाली. या नौकेवरील ७ खलाशांना (नौकेवरील मासेमारांना) वाचवण्यात यश आले आहे, तसेच बुडालेली नौका पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला जात आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.