बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात काणकोण येथे निषेध मोर्चा

महंमद युनूस यांच्या पुतळ्याचे दहन करतांना काणकोणमधील हिंदू

काणकोण, २१ डिसेंबर (वार्ता) – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात २१ डिसेंबर या दिवशी काणकोण येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. कदंब बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या आरंभी सूरज कोमरपंत यांनी घोषणा देऊन बांगलादेश सरकारच्या प्रमुखांचा निषेध केला. या वेळी नगरसेवक शुभम् कोमरपंत, हेमंत नाईक गावकर, बजरंग दलाचे गौरीश भैरेली, मल्लेश नाईक गावकर आणि अन्य कार्यकर्ते, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिलखुश शेट देसाई, सिद्धार्थ देसाई आणि अन्य कार्यकर्ते, विश्‍व हिंदु परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.