कोणतीही अनोळखी ‘लिंक’ न उघडता ती ‘डिलीट’ करा !
साधकांना सूचना आणि धर्मप्रेमी, हितचिंतक अन् वाचक यांना विनंती !
सध्या समाजात विविध प्रकारच्या फसव्या आणि बनावट संदेशाच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती ‘हॅक’ करू शकणार्या ‘लिंक’ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. असाच एक प्रकार म्हणून काही साधक, धर्मप्रेमी, वाचक आणि हितचिंतक यांना ‘आपल्या कुटुंबियांचे छायाचित्र पहा,
This is a picture of your family http://of1zgcahn.top/login’
अशा प्रकारची ‘लिंक’ येत असल्याचे त्यांनी कळवले आहे. ही ‘लिंक’ आपल्या संपर्कात असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने येते. त्यामुळे उत्सुकता म्हणून अशी ‘लिंक’ उघडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यामध्ये आपली काही वैयक्तिक माहिती जसे टेलिग्राम नंबर, त्याचा पासवर्ड / OTP आदी मागितली जाते. ही माहिती देऊन लिंक उघडल्यास त्यामध्ये अश्लील किंवा नको ती छायाचित्रे आढळतात. त्याचसमवेत अशा ‘लिंक’च्या माध्यमातून आपल्या ‘स्मार्टफोन’मधील माहिती Contacts ‘हॅक’ करण्याचाही प्रयत्न असू शकतो.
तसेच अशा प्रकारे आपल्या टेलिग्राम अकाऊंटला hack केल्यावर आपल्याच अकाऊंट मधून आपल्याच नावाने आपल्या सर्व कॉन्टॅक्टला असे ‘मेसेज’ पाठवले जातात आणि त्यांच्यापैकी जे कुणी ती ‘लिंक’ उघडतील त्यांचे ‘कॉन्टॅक्ट’ चोरले जातात आणि ही साखळी अशीच चालू रहाते.
अशा प्रकारे मिळवलेल्या ‘कॉन्टॅक्ट’चा ‘हॅकर’ कोणत्याही अन्य गैरकृत्यासाठी वापर करू शकतो. अमुक व्यक्तीकडून तुमचा हा ‘कॉन्टॅक्ट’ नंबर मिळाला किंवा आयत्या मिळालेल्या ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’चा वापर अन्य ‘फ्रॉड’साठीही होऊ शकतो.
त्यामुळे साधक, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक यांना अशा प्रकारची ‘लिंक’ प्राप्त झाल्यास ती न उघडता तो संदेश ‘डिलीट’ करावा. जेणेकरून पुढे कुठल्याही प्रकारचा अनर्थ होणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता, न घाबरता अशा प्रकारची ‘लिंक’ डिलीट करून तिच्याकडे दुर्लक्ष करावे.
टीप – तांत्रिकदृष्ट्या या ‘लिंक’मध्ये ‘http’ अशी केवळ ४ अक्षरे असतात. यातून ही ‘लिंक’ असुरक्षित असल्याचे सिद्ध होते. ‘लिंक’ सुरक्षित कि असुरक्षित आहे, अशा तपाशिलात न जाता अशा प्रकारची ‘लिंक’ न उघडता तात्काळ ‘डिलीट’ करावी.