६ आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी !
कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचे प्रकरण
कल्याण – येथील सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाकडून त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश एन्.पी वासादे यांनी हा निर्णय सुनावला.