गडचिरोली येथे २ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !
गडचिरोली – येथे २ नक्षलवाद्यांनी सी.आर्.पी.एफ्. आणि पोलीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. दोघांवर ८ लाख रुपयांचे पारितोषिक होते. कौटुंबिक दबावाखाली त्यांनी आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येत आहे. रामसू दुर्गु पोयाम उपाख्य नरसिंग (वय ५५ वर्षे) आणि रमेश कुंजम उपाख्य गोविंद (वय २५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. रामसू हा गडचिरोलीचा आहे, तर रमेश छत्तीसगडचा आहे.