पोलिसांच्या तावडीतून पळालेली महिला गुन्हेगार १० महिन्यांनंतर कह्यात !

पुणे – शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात ४ कोटी ६ लाख १७ सहस्र रुपये पाठवण्यास सांगून फसवणार्‍या महिला सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले. सानिया, तसेच गुड्डीया महंमद मुस्तकीन साहब सिद्दिकी (वय २१ वर्षे) असे तिचे नाव आहे. एक वर्षापूर्वी सायबर पोलिसांनी तिला कह्यात घेतले होते; मात्र पुण्याला घेऊन येत असतांना तिने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. (ताब्यातील आरोपीला सांभाळू न शकणारे अकार्यक्षम पोलीस ! अशा पोलिसांवरही कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) १० महिन्यानंतर तिचा शोध घेऊन बिहार येथील गोपालगंज जिल्ह्यातील लोहरपत्ती थावे येथे जाऊन पुणे पोलिसांनी तिला कह्यात घेतले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी मार्गदर्शन केले.