शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !
|
शिर्डी – मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जीवदानीदेवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, नगर-मनमाड रोड, निमगांव, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून १ सहस्रांहून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी २१ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मालेगाव येथील ‘श्री वैजनाथ महादेव देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष निवृत्त सेना अधिकारी मेजर किसन गांगुर्डे, ‘नाशिक गोरेराम मंदिरा’चे मालक श्री. दिनेश मुठे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. प्रदीप देशमुख उपस्थित होते.
Maharashtra Mandir Mahasangh to Host Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ on December 24-25, 2024
The two-day conference will bring together over 1,000 temple trustees, archakas, advocates, and researchers to discuss pressing issues affecting temples, including:
1️⃣ Freeing… pic.twitter.com/QGK5f0q8Uc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 21, 2024
मंदिर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘फेब्रुवारी २०२३ मध्ये जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ओझर, पुणे येथे दुसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून २ वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ सहस्रांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.’’
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत अनेक मान्यवरांचा सहभाग ! – दिनेश मुठे, गोरेराम मंदिराचे मालक
गोरेराम मंदिराचे मालक श्री. दिनेश मुठे म्हणाले ‘‘या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे, जैन मंदिराचे श्री. गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत डॉ. अमित थढाणी, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास श्री. संदीप सिंह, ‘बाणगंगा ट्रस्ट’चे श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.