पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले संशोधन

आज २२ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त…

‘सर्वसाधारण व्यक्ती मृत पावते, तेव्हा तिच्या पार्थिवातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे वातावरण दूषित होते. याउलट आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या व्यक्ती, उदाहरणार्थ संत देहत्याग करतात, तेव्हा त्यांच्या पार्थिवातून चैतन्य प्रक्षेपित होऊन वातावरण चैतन्यमय बनते. देहत्यागानंतरही संतांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते.

सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) लोखंडेआजी (वय १०० वर्षे) यांनी १३.१२.२०२४ या दिवशी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी देहत्याग केला. पू. आजींचे अंत्यदर्शन घेतांना सनातनचे संत आणि साधक यांना विविध अनुभूती आल्या. पू. आजींच्या पार्थिवातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे सर्वांना जाणवले. पू. आजींचे नातेवाईक बाहेरगावाहून येणार असल्याने त्यांचा अंत्यविधी दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५ वाजता करण्यात आला.

देहत्यागानंतर पू. लोखंडेआजी यांच्या चेहर्‍याची विविध टप्प्यांवर छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचण्यांतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.

देहत्याग केलेल्या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजींचा दिसणारा चेहरा
देहत्यागाच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी अंत्यविधीनंतर पू. (श्रीमती) लोखंडेआजींचा दिसणारा चेहरा

पू. लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

पू. लोखंडेआजी यांच्या ४ छायांचित्रांपैकी केवळ १ छायाचित्रात (देहत्यागाच्या दिवशीच्या छायाचित्रात) अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली आणि तिची प्रभावळ ५ मीटर होती. पू. आजींच्या चारही छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. या छायाचित्रांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.

सौ. मधुरा कर्वे

१. पू. आजी यांनी देहत्याग केला त्या रात्री त्यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५४० मीटर होती. दुसर्‍या दिवशी सकाळी ती ७०० मीटर झाली, म्हणजे आदल्या दिवशीच्या तुलनेत ती १६० मीटरने वाढली.

२. दुसर्‍या दिवशी सायंकाळी पू. आजींचा अंत्यविधी आरंभ होण्यापूर्वी त्यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जा १२२० मीटर होती, म्हणजे सकाळच्या (७०० मीटर) तुलनेत ती ५२० मीटरने वाढली.

३. दुसर्‍या दिवशी सायंकाळी अंत्यविधीनंतर पू. आजींच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जा १५६० मीटर झाली, म्हणजे आधीच्या (१२२० मीटर) तुलेनत ती ३४० मीटरने वाढली.

यातून पू. आजींच्या छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, पू. आजींनी देहत्याग केल्यापासून अवघ्या दीड दिवसांत त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. यातून ‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.१२.२०२४)

इ-मेल : mav.research2014@gmail.com 

पू. लोखंडेआजींची नातसून सौ. रोहिणी भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना पू. आजींच्या देहत्यागानंतरच्या छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे

१. पू. आजींच्या देहत्यागानंतरच्या छायाचित्रांकडे पाहून मला शांतीची अनुभूती आली. माझे सहजतेने ध्यान लागत होते आणि मन निर्विचार झाले होते.

२. नेहमीच्या तुलनेत या छायाचित्रांकडे पाहून मला अधिक प्रमाणात शांती जाणवत होती.

३. देहत्यागाच्या दिवसापेक्षा दुसर्‍या दिवशी पू. आजींचा चेहरा पुष्कळ प्रसन्न आणि अधिक चैतन्यमय वाटत होता. दुसर्‍या दिवशी वातावरण पुष्कळ हलके वाटत होते.

४. पू. आजींच्या छायाचित्रांकडे पाहून ‘त्या श्वास घेत आहेत’, असे जाणवले.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक