बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत !

पोलीस अधीक्षक नवनीत कांवत

बीड – बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे त्वरित स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कांवत हे वर्ष २०१७ च्या तुकडीचे आय.पी.एस्. अधिकारी आहेत. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे.