काठमांडू येथे माओवाद्यांची महायुतीविरोधात बैठक !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत माहिती

देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला, तर पुढे काय करायचे ? या पार्श्वभूमीवर माओवाद्यांची नेपाळची राजधानी काठमांडू येथे बैठक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार १२ ते १४ नोव्हेंबर या काळात माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यास त्याला अस्थिर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या बैठकीला माओवाद्यांचे भारतासह नेपाळ आणि बांगलादेश येथील सदस्य उपस्थित होते. भारत, नेपाळ, बांगलादेश आणि मणीपूर येथील काही निवडक कॉम्रेड्स सहभागी झाले होते.

बैठकीत देण्यात आलेले निर्देश ! 

१. पहिल्या टप्प्यात प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांतून इ.व्ही.एम्. विरोधात आरोप करत राज्यात संशयाचे वातावरण निर्माण करणे.

२. दुसर्‍या टप्प्यात इ.व्ही.एम्. विरोधात संपूर्ण देशातील इतर राज्यांतही आवाज बुलंद करून निवडणुका इ.व्ही.एम्.द्वारे नव्हे, तर मतपत्रिकेद्वारे घेण्यासाठी आंदोलन उभे करणे.

३. तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील महायुती सरकारवर नाराज असणार्‍या वेगवेगळ्या घटकांना विशेषतः मुस्लिम, दलित आणि ओबीसीतील काही विशिष्ट घटकांना रस्त्यावर उतरवून सरकार विरोधात वातावरण निर्माण करणे.

४. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकाची स्थिती निर्माण झाल्याचा दावा करत विद्यमान सरकारविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई (हिंसक आंदोलन) उभी करणे.