विनाअनुमती स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – शहरातील विविध व्यायामशाळांमध्ये (जिम) व्यायाम करणार्‍या युवकांना विनाअनुमती स्टेरॉईड इंजेक्शन ‘मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन’ (इंजेक्शन : शरिरामध्ये सुईद्वारे औषध सोडणे) विक्री करणार्‍या दीपक वाडेकर आणि साजन जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरीरयष्टी चांगली करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आरोपींकडून ५ सहस्र रुपयांची १४ स्टेरॉईड इंजेक्शने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार तेजस चोपडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.