कामाची गती अल्प असल्याने ठेकेदाराला काळ्या सूचीमध्ये का टाकू नये ? – आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील
पुणे – पिंपरी शहराला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या जलवाहिनीच्या कामाची गती पुष्कळ अल्प आहे. ४ वर्षांची समयमर्यादा संपली, तरी केवळ ४८ टक्केच काम झाले आहे. तेव्हा त्या ठेकेदाराला काळ्या सूचीमध्ये का टाकू नये ? अशी चेतावणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली. कामाच्या संदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये संबंधित ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ही जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आदेश १५ डिसेंबर २०२० या दिवशी दिला होता. कामाची समयमर्यादा १५ डिसेंबर २०२४ ही ठरली होती. १९ किलोमीटरचे असून आतापर्यंत केवळ ९ किलोमीटरचे काम झाले असल्याची स्थिती आहे.