पुणे येथे विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या संस्थाचालकाला अटक !
नृत्य शिक्षकाला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे – वारजे-माळवाडी भागातील नामांकित शाळेतील नृत्य शिक्षकाने ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांसह अन्य मुलांवरही भ्रमणभाषवरील अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण करून कुठे वाच्यता केल्यास मारहाणीची धमकी दिली. हे उघडकीस आल्यानंतर संबंधित शिक्षकांवर २ गुन्हे नोंदवण्यात आले असून नृत्य शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. शाळेचा संस्थाचालक अन्वित फाटक याला १९ डिसेंबर या दिवशी अटक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यापासून चालू होता. पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे, असा आरोप पालकांनी केला.