MEA Spokesperson Randhir Jaiswal : (म्हणे) ‘सार्वजनिक टिपण्यांबद्दल सावध रहा अन्यथा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो !’

बांगलादेश सरकारच्या सल्लागाराने नकाशात भारताची राज्ये दाखवल्यावर भारताची ४ दिवसांनी प्रतिक्रिया !

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम याने १६ डिसेंबर या बांगलादेशाच्या निर्मितीच्या वर्धापनदिनाच्या दिवशी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये बांगलादेशाच्या नकाशामध्ये भारतातील बंगाल, त्रिपुरा आणि आसामचा काही भाग दाखवला होता. याला विरोध झाल्यानंतर त्याने ही पोस्ट हटवली होती. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ४ दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला कळले आहे की, ती पोस्ट काढून टाकण्यात आली आहे; परंतु तरीही आम्ही त्यांना सार्वजनिक टिप्पण्यांबद्दल सावध रहाण्याची आठवण करून देऊ इच्छितो. अशा टिपण्या जाहीर करतात की, सार्वजनिक टिपण्या करतांना आपण अधिक उत्तरदायी असणे आवश्यक आहे. भारताने बांगलादेशाच्या लोकांशी आणि अंतरिम सरकारशी संबंध वाढवण्यात वारंवार रस दाखवला आहे; पण अशा कृतींमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

बांगलादेशात ऑगस्टपासून हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराची २ सहस्र २०० घटना

रणधीर जैस्वाल यांनी या वेळी सांगितले की, शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ मध्ये त्यागपत्र दिल्यानंतर बांगलादेशात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची २ सहस्र २००  प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याच काळात पाकिस्तानमध्येही अशी ११२ प्रकरणे समोर आली आहेत. भारत सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत आणि बांगलादेश सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेश सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्य यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल, अशी भारताला आशा आहे. (जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून अशा आशा ठेवणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे आहे, हे भारताला अजूनही कसे कळत नाही ? – संपादक)


हे वाचा → Bangladesh Mahfuz Alam Disputed Map : बांगलादेशाचे प्रमुख महंमद यूनूस यांच्या सल्लागाराने बांगलादेशाच्या नकाशात दाखवले बंगाल, आसाम आणि त्रिपुरा !

संपादकीय भूमिका

भारतासमवेतचे संबंध चांगले ठेवण्याचा बांगलादेशाचा कोणताही प्रयत्न नाही, उलट तो भारताला चिथावणीच देत आहे. असे असतांना भारत आत्मघाती गांधीगिरी का करत आहे ?, असाच प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !