‘अध्यात्मच विज्ञानाची जननी असून अध्यात्म नेहमीच श्रेष्ठ आहे’, याविषयी सुचलेले विचार !
प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने सुचलेले विचार येथे दिले आहेत. अध्यात्मच विज्ञानाची जननी आहे आणि अध्यात्म नेहमीच श्रेष्ठ आहे. याविषयी काही उदाहरणे येथे दिली आहेत.
१. ‘ऋग्वेदातील ८ व्या अष्टक दशम मंडलात ‘पृथ्वी सूर्यनारायणाला प्रदक्षिणा घालते’, असे सांगितले आहे. वेदांतील ज्ञान कोट्यवधी वर्षांपूर्वी, काही युगांपूर्वी मिळालेले आहे. तेव्हा वैज्ञानिक ‘१०० ते २०० वर्षांपूर्वी त्यांनी ही माहिती मिळवली’, असे कसे म्हणू शकतात ?
सविता यन्त्रैः पृथिवीमरम्णादस्कम्भने सविता द्यामदृंहत् । – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १४९, ऋचा १
अर्थ : सूर्याने किंवा परमात्म्याने स्वत:च्या नियंत्रणसामर्थ्याने पृथ्वीला निरालंब अंतरिक्षात धारण केले.)
२. पुरुषसूक्त आणि श्रीसूक्त यांत विद्युत्निर्मिती करणार्या तंत्राचे ज्ञान आहे. या माहितीचा उपयोग केल्याने १० ‘वॅट’ची वीज निर्माण होते. असे हे ईश्वराने दिलेले दिव्य ज्ञान आहे.
३. अग्नीसूक्तात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विषयीचे (Missile Technology) ज्ञान आहे.
४. प्रत्येक सूक्तात वेगवेगळ्या तंत्रविद्या विज्ञानाशी संबंधित ज्ञान आहेत.
यावरून अध्यात्म हीच श्रेष्ठ जगन्माता आहे, हे सिद्ध होते.
‘गुरुदेवा, ही सूत्रे लिहितांना विद्युत्पुरवठा खंडित झाला आणि नंतर सुरळीत आला. तेव्हा ‘आपणच हे विचार माझ्याकडून लिहून घेत आहात आणि ऐकतही आहात’, असे मला अनुभवता आले. आपल्या दिव्य कमलचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. जयंत मल्या (वय १३ वर्षे), उडुपी, कर्नाटक. (२८.८.२०२३)