बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा ! – अधिवक्ता संघटनेची केंद्राकडे मागणी

उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांना निवेदन देतांना अधिवक्ता संघटनेचे शिष्टमंडळ

पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेश येथे अटकेत असलेले ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची सुटका करणे आणि बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार रोखणे, यांसाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे निवेदन आदर्श राष्ट्र्ररचनेसाठी कार्यरत असलेल्या अधिवक्ता संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या वतीने पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यासंबंधीचे निवेदन पणजी येथील उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांना सुपुर्द करण्यात आले. अधिवक्ता संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये अधिवक्ता यश नाईक, अधिवक्ता रूपेश गावस, अधिवक्ता सुशांत धाऊसकर, अधिवक्ता सुनील सिरसाट, अधिवक्ता सुधांशू मोरजकर, अधिवक्ता संतोष अनुर्लेकर आणि अधिवक्त्या सौ. सुरक्षा गावस यांचा समावेश होता.
या निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.