झारखंड, बंगाल आणि पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये या ठिकाणच्या हिंदूसंघटन कार्याला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कार्याच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी एक पैलू म्हणजे हिंदूसंघटन करणे होय. तसे पहाता आज भारतात अनेक हिंदु संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आरंभ होऊन केवळ २२ वर्षेच झाली आहेत; परंतु आतापर्यंत १ सहस्रपेक्षा अधिक संघटना एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. कार्यकर्त्यांच्या मर्यादित संख्येमुळे समितीचे कार्य ओडिशा, झारखंड, बंगाल आणि पूर्वोत्तर भारतातील राज्ये येथे फारसे झाले नसूनही तेथील समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर समाजातून मिळणारा प्रतिसाद आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या कृपेची अनुभूती त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.
१. ओडिशा
येथे समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ हे अभियान राबवण्यात आले. तेव्हा राऊरकेला, ब्रह्मपूर, भुवनेश्वर आणि कटक या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. या भागात तीन वर्षे प्रत्यक्ष संपर्क नव्हता, तरीही या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये २० जणांना निमंत्रित केले होते आणि त्यातील ६ जण ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त प्रत्यक्ष सहभागीही झाले होते.
२. झारखंड
दोन वर्षांपूर्वी ‘राष्ट्रीय हिंदू अधिवेशना’त झारखंडचा एकही हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाला नव्हता. मागील वर्षी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने १० जण सहभागी झाले होते.
३. बंगाल आणि आसाम
या वर्षी प. बंगालमधील १७ हिंदुत्वनिष्ठ ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाले होते. तसेच आसाममधून ३ हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
अशा प्रकारे एकूण ३९ जण सहभागी झाले, ज्यामध्ये ३ संतही होते. या वर्षी या संपूर्ण क्षेत्रातून १०० पेक्षा अधिक लोकांना या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
या क्षेत्रांमध्ये जो काही प्रतिसाद मिळत आहे, तो केवळ आणि केवळ हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, बाबा बैद्यनाथ, कालीमाता आणि कामाख्यादेवी यांची कृपा अन् आशीर्वाद यांच्यामुळेच मिळत आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे), धनबाद, झारखंड. (२६.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |