परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेला उडुपी, कर्नाटक येथील कु. जयंत मल्ल्या (वय १३ वर्षे) !
१. अनेक भाषा अवगत असणे
‘कु. जयंतला अनेक भाषा बोलता आणि लिहिता येतात. तो हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड आणि कोकणी या भाषा बोलतो. त्याने हिंदी आणि मराठी या भाषांचे शिक्षण घेतले नसतांनाही तो शब्दकोशांचे साहाय्य घेऊन या भाषा शिकला.
२. सनातन धर्म आणि अध्यात्म यांच्याप्रती भाव अन् श्रद्धा
प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने त्याच्यामध्ये देवता, ऋषिमुनी, राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती भाव अन् श्रद्धा आहे. त्याने अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले आहे. तो आम्हाला त्यातील कथा सांगतो. तो म्हणतो, ‘‘अध्यात्म विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे.’’
३. गुरुदेवांप्रती श्रद्धा
गुरुदेवांच्या कृपेने जयंतमध्ये लहानपणापासूनच गुरुदेवांप्रती श्रद्धा, भाव आणि भक्ती आहे. तो आम्हाला सांगतो, ‘‘प.पू. गुरुदेव श्रीमन्नारायण आहेत. ते करुणामय आणि ब्रह्मांडनायक परमेश्वर आहेत. गुरुदेवच सर्वकाही करतात.’’ तो गुरुदेवांनी केलेल्या मार्गदर्शनाविषयी आम्हाला सांगतो.
४. जयंतचे स्वभावदोष
आळशी, राग येणे आणि अव्यवस्थितपणा’
– श्री. सोमनाथ मल्ल्या आणि सौ. प्रीती मल्ल्या (कु. जयंतचे वडील आणि आई), उडुपी, कर्नाटक. (६.२.२०२४)