ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग करणार्यांवर कठोर शिक्षेचे प्रावधान करावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गडदुर्गांचे अन् पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात. शिवकालीन आणि यादवकालीन अनेक गडदुर्गांवर मद्य सेवन आणि जुगार खेळला जातो. तरुण पिढीला या गडदुर्गांचे पावित्र्य ठाऊक नाही. या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी आणि पावित्र्य भंग करणार्यांवर कठोर शिक्षेचे प्रावधान करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १८ डिसेंबरला महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्वशास्त्र विषयक स्थळे अन् अवशेष (सुधारणा) विधेयकावरील चर्चेच्या वेळी सरकारकडे केली.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व शास्त्रविषयक स्थळे अन् अवशेष (सुधारणा) विधेयक २०२४ आणून शासनाने अत्यंत स्तुत्य काम केले आहे. हे विधेयक अत्यंत चांगले आहे.
संपादकीय भूमिकाकठोर शिक्षेच्या प्रावधानासमवेत तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केल्यास ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग होणार नाही ! |