Nitin Gadkari On Live-IN-Relationship : समलैंगिक विवाहांमुळे सामाजिक व्यवस्था कोलमडेल !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य !

नवी देहली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) आणि समलैंगिक विवाह समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहेत आणि यामुळे सामाजिक व्यवस्था कोलमडू शकते.

नितीन गडकरी एका मुलाखतीत म्हणाले की,

समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल. ‘लिव्ह-इन’ संबंध चांगले नाहीत’, असेही ते म्हणाले. वर्ष २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता.