अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने बांगलादेशात लावली आहे आग !

बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या अराजकामध्ये अमेरिकेचे राज्य खाते, ‘सीआयए’ (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी)’ ही गुप्तचर यंत्रणा आणि ‘नियोकॉन्स’ यांनी अंगीकृत केलेली पद्धती यांचा वापर होत आहे.अमेरिकेचा अनावश्यक हस्तक्षेप, योग्य असलेले शासन उलथवून टाकणे, लष्करी हुकूमशहाची स्थापना करणे आणि अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांना राज्यांचे प्रमुख म्हणून स्थापित करणे या धोरणांमुळे अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था आणि समाजातील एकात्मता ढासळली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

१. बांगलादेशाप्रमाणे अमेरिकेच्या हातातील बाहुले बनलेला युक्रेन !

अलीकडचे उदाहरण, म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अयशस्वीरित्या माघार घेण्ो आणि मोठ्या प्रमाणात युक्रेनला भडकावून त्याला विनाशकारी परिणामांसह रशियाशी अनावश्यक युद्धात ढकलणे यांमुळे बायडेन प्रशासनावर टीका होत आहे. बायडेन प्रशासनाने इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांच्या पाठिंब्याने चालू केलेल्या रशिया अन् युक्रेन यांच्या संघर्षात युक्रेनचे सहस्रो नागरिक मारले गेले आहेत. ‘सीआयए’ने ‘नाटो’पासून (उत्तर अटलांटिक करार संघटनेपासून) आणि रशियामधील समस्येपासून दूर रहाण्यात यशस्वी ठरलेल्या अध्यक्षाला (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन) बाहेर काढण्यात यश मिळवले. व्यवसायाने अभिनेता आणि एक विदुषक असलेल्या व्लोदिमिर झेलेंस्की यांना (युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की) ‘निवडणुकीत’ युक्रेनच्या लोकांवर लादण्यात आले.

कर्नल रामाकृष्णन् सी.एन्. (निवृत्त)

२. अमेरिकेमुळे युक्रेनचा नाश

अमेरिकेने पाठिंब्याचे आश्वासन देत बायडेन प्रशासन नव्याने निवडून आलेल्या व्लोदिमिर झेलेंस्की यांना मूर्ख बनवून निर्णय घेण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या रशियाला भीती वाटली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेली रेषा म्हणून काय विचारात घ्यावे, याविषयी अमेरिका आणि ‘नाटो’ यांना सल्ला दिला होता अन् वारंवार चेतावणी दिली होती.अमेरिकेने झेलेंस्की यांना रशियन सुरक्षेची रेषा जाणूनबुजून ओलांडण्यास भाग पाडले. त्यामुळे रशियाला युक्रेन विरुद्ध युद्ध केल्याविना पर्याय नव्हता. आज युक्रेन उध्वस्त झाला आहे, सहस्रो लोक मरण पावले आणि घायाळही झाले आहेत, त्यांची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे अन् लाखो लोक युरोपच्या शेजारील राज्यांमध्ये साहाय्यासाठी देश सोडून पळून गेले आहेत.

३. बांगलादेशामधील गोंधळाची स्थिती आणि अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर

बांगलादेशातील राजकीय अशांततेमुळे देशातून होणार्‍या निर्यातीत घट झाली आहे. वर्ष २०२४ च्या पहिल्या ३ मासांत बांगलादेशामधील निर्यात जवळजवळ ३० टक्के न्यून झाली. कारखाने बंद आणि निदर्शने यांचा बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्त्रोद्योगावर परिणाम झाला आहे. बांगलादेश स्वतःचा विनाश करण्याच्या आणि अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. महंमद युनूस सरकारकडून जातीय हिंसाचाराला मोकळीक दिली जात आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना विशेषतः हिंदूंना ‘जमात-ए-इस्लामी’ आणि ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.)’ यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या धर्मांध इस्लामी कट्टरतावाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

४. बांगलादेशामध्ये वाढता धार्मिक कट्टरतावाद आणि हिंदूंच्या कत्तलीचे प्रयत्न

‘जमात-ए-इस्लामी’सारख्या आतंकवादी संघटनांनी बांगलादेशातील खालिदा झियाच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’सारख्या राजकीय पक्षांशी हातमिळवणी केली आहे. मुजिबूर रेहमान यांची मुलगी शेख हसीना (मुजिबूर रेहमान यांची १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी पाकिस्तानी प्रशिक्षित अधिकार्‍यांनी हत्या केली) यांच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले गेले आणि अमेरिकेने महंमद युनूस यांना देश कह्यात घेण्यासाठी बांगलादेशात स्थापित केले. लोकशाहीच्या नावाखाली महंमद युनूस यांनी स्वतःला बांगलादेशमधील अंतरिम सरकारचा प्रमुख असल्याचे घोषित केले आणि ‘निवडणुका होण्यापूर्वी आणखी ४ वर्षे आपली  राजवट असावी’, अशी मागणी केली आहे. महंमद युनूस या व्यक्तीमध्ये असलेल्या प्रशासकीय क्षमतेच्या अभावामुळे गुंडगिरी आणि हिंसाचाराला सामोरे जाण्यात ते असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. महंमद युनूस यांनी सत्ता हाती घेताच हिंदूंविरुद्ध दंगली उसळल्या, शेकडो हिंदूंची घरे जाळण्यात आली, पुरुषांची कत्तल करण्यात आली, हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने हिंदु मंदिरे उद्ध्वस्त करण्यासाठी मुसलमान गुंडांच्या टोळ्यांना सोडले आणि हिंदूंना दसरा अन् कालीपूजा हे सण साजरे करण्यापासून रोखले.

५. डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी बांगलादेशातील परिस्थिती अजून चिघळवण्याचा प्रयत्न

नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले डॉनल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या वंशहत्येविषयी चिंता व्यक्त केली आणि ‘ट्वीट’ केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारण्यापूर्वी युनूस यांच्या बांगलादेश सरकारला  तेथील परिस्थिती आणखी चिघळवण्यास अमेरिकेच्या बायडेन प्रशासन प्रवृत्त केले आहे; कारण डॉनल्ड ट्रम्प यांनी हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याचे आवाहन केले आहे.

६. भारताशी मैत्रीचे संबंध दाखवून त्याच्या विरोधी कारवाया करण्याचे बायडेन यांचे धोरण

अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अमेरिकेची भारताशी असलेली मैत्री, लोकशाहीचे लाभ, दोन्ही देशांमध्ये असलेला व्यापार अन् सुरक्षा, तसेच विविध स्तरांवर करण्यात येणार्‍या उपाययोजना यांचे वारंवार कौतुक केले आहे. असे असले, तरी गेल्या काही मासांत बायडेन प्रशासनाने युनूस यांना दिलेला पाठिंबा हे भारताला एकटे पाडण्याच्या आणि कमकुवत करण्याच्या त्यांच्या निरंतर प्रयत्नांचे उदाहरण आहे.

७. बांगलादेशामध्ये अजून वाईट दिवस येणे शेष आहेत !

झिया उर रहमान आणि खलिदा झिया यांचा मुलगा तथा ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षा’चा अध्यक्ष तारिक रहमान याची बांगलादेशात परतण्याची शक्यता आहे. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षा’च्या ‘इंडिया आऊट’ (भारताने बांगलादेशातून निघून जावे) मोहिमांचे श्रेय मिळणारा ‘भारतविरोधी’ म्हणून त्याला ओळखले जाते. (तो सध्या बेपत्ता असून पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याकारणाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.) तारिक रहमान याने काही मासांपूर्वी जिथे हसीना यांना हटवण्यासाठी बांगलादेशात मोहीम चालू करण्याची आणि परिस्थिती निर्माण करण्याची योजना आखली होती. तो मध्यपूर्वेकडील एका देशात पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’च्या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेला होता. तो बांगलादेशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

८. हिंदूंनी स्वतःच्या हक्कासाठी उभे रहाण्याची आवश्यकता !

कट्टरपंथी आणि जिहादी यांनी पसरवलेल्या हिंसा अन् द्वेष यांच्या जगात हिंदूंनी जगण्यासाठी, तसेच स्वतःच्या हक्कासाठी उभे रहाण्याची वेळ आली आहे. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी कोणतीही कसर सोडू नये, अशी आमची, म्हणजेच भारतातील लोकांची अपेक्षा आहे.

– कर्नल रामाकृष्णन् सी.एन्. (निवृत्त), देहली.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी पाश्चात्त्य देशांची निष्क्रिय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर आजही अत्याचार चालूच आहेत. तेथील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघासह कोणताही पाश्चात्त्य देश पुढे आलेला नाही. भारतातील विरोधी पक्षांनीही हिंदूंचे दुःख आणि त्यांची कत्तल या सूत्रांवर मूक भूमिका घेतली आहे.

– कर्नल रामाकृष्णन् सी.एन्. (निवृत्त), देहली.

संपादकीय भूमिका

भारतासह बांगलादेशातील आणि जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनीच आता प्रभावी संघटन करणे अपेक्षित !