कोची (केरळ) मधील ‘आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सवा’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोची (केरळ) – येथे ‘आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव’ पार पडला. त्यात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कालावधीत अनेक जिज्ञासूंनी ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, देवतांची सात्विक चित्रे यांचा लाभ घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. आहार आणि मुले यांच्याशी संबंधित ग्रंथ जिज्ञासूंना अधिक आवडले.
२. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. श्रीजित पणिक्कर हे या पुस्तकोत्सवात एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने आले होते. या वेळी ते व्यस्त असूनही सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर आले आणि सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतले. श्री. श्रीजित पणिक्कर यांनी सर्व ग्रंथ पाहून ‘हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे’, असे सांगितले.