Bangladeshi Arrested Death Threat UP CM : योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या बांगलादेशी शेख अताऊल याला अटक

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणारा शेख अताऊल गजाआड !

नवी देहली : उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या शेख अताऊल (वय ४० वर्षे) याला देहलीतील शाहीन बाग परिसरातून नोएडा पोलिसांनी अटक केली. तो मूळचा बांगलादेशाचा असून त्याचे कुटुंब बंगालच्या मुसलमानबहुल मालदा जिल्ह्यात स्थायिक झाले आहे. सध्या तो शाहीनबागमध्ये रहात आहे. पोलिसांनी शेख अताऊल यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, एक चाकू, कागदपत्रे आणि भ्रमणभाष संच जप्त केला आहे. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी दिली होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या नेत्यांना कोण ठार मारू पहात आहेत, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर मात्र गप्प बसतात !