SP MP Zia Ur Rehman Barq : संभल (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा नोंद

खासदार झियाउर रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क आणि माजी खासदार शफीकुर रहमान बर्क यांच्या नावाने बसवलेल्या वीज मीटरमध्ये अनियमितता आढळून आली आहे. खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या विरोधात वीजचोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या वीज मीटरच्या तपासणीतून ही माहिती समोर आली. बर्क यांच्यावर या कर्मचार्‍यांना धमकावल्याचाही आरोप आहे. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वी त्यांच्या घराचे जुने वीज मीटर पालटून तेथे नवीन इलेक्ट्रॉनिक वीज मीटर लावण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस फौजाफाटा तैनात करण्यात आला होता. येथे यापूर्वी वीज कर्मचार्‍यांवर आक्रमणे झाल्याच्या घटना घडल्यामुळे ही दक्षता घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हे पोलिसांना लज्जास्पद आहे ! मुसलमानबहुल भागांत मुसलमानांना पोलिसांचा धाक नसल्यानेच ते असे कृत्य करण्याचे धाडस करत आहेत. अशांवर वचक बसवण्यासाठी आता कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

वीज कर्मचार्‍यांनी बर्क यांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे यांना लागणारी वीज यांचा आढावा घेतला. त्यांनी वीज मीटर आणि अन्य सर्व माहिती पुढील तपासासाठी दिली आहेत. त्यांचा अहवाला आल्यानंतर बर्क यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मुसलमानबहुल भागात २० ठिकाणी वीजचोरी

१८ डिसेंबर या दिवशी वीज विभागाच्या पथकाने मुसलमानबहुल नवाबखेल आणि हयातनगर येथे २० ठिकाणी वीजचोरीचे प्रकार उघडकीस आणले. नवाबखेल परिसरातील एका गोदामाचे ई-रिक्शा चार्जिंग स्टेशनमध्ये रूपांतर करण्यात आले. गोदामात ११ ई-रिक्शांना भारित करण्यासाठी वीजचोरी केली जात असल्याचे पथकाला आढळले. विभागाने सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (मुसलमानबहुल भागांत वीजचोरी होते, हे यातून समोर आल्याने आता संपूर्ण देशातील मुसलमानबहुल भागांत धडक मोहीम राबवून वीजचोरांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • अशांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्यांची खासदारकीही रहित केली पाहिजे !
  • धर्मांध मुसलमान किती मोठ्या पदावर पोचले, तरी ते त्यांची गुन्हेगारी मानसिकता तेथेही दाखवतात !