Ganga Maharani Temple Bareilly : बरेली (उत्तरप्रदेश) येथील २५० वर्षे जुन्या मंदिरावर मुसलमानाचे बेकायदेशीर नियंत्रण !

मंदिरावरील नियंत्रण हटवून हिंदूंच्या नियंत्रणात देण्याची स्थानिक हिंदूंची मागणी

बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली किल्ल्याजवळील कटघर परिसरातील सुमारे २५० वर्षे जुने गंगा महाराणी मंदिर मुसलमानाने बळकावल्याचा आरोप हिंदूंकडून करण्यात आला असून त्यांचे नियंत्रण हटवून मंदिर हिंदूंच्या कह्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.

१. कटघरचे रहिवासी नरेंद्र सिंह यांचा दावा आहे की, त्यांच्या पूर्वजांनी २५० वर्षांपूर्वी गंगा महाराणी मंदिर बांधले होते. या मंदिराची नोंद वर्ष १९०५ च्या कागदपत्रांमध्ये झाली होती. वर्ष १९५० पर्यंत तेथे पूजा केली जात होती. तत्कालीन पुजार्‍याने मंदिरातील एक खोली एका समितीला भाड्याने दिली, ज्याने वाहिद अली या मुसलमानाला मंदिरात पहारेकरी म्हणून कामावर ठेवले. त्यानेच मंदिरात येणार्‍या भाविकांना रोखले, तसेच मंदिरातील मूर्ती हटवल्या.

२. चौकीदार वाहिद अली याचा मुलगा साजिद याने दावा केला आहे की, वर्ष १९७६ पासून येथे समितीकडून कारभार चालू आहे. येथे माझ्या वडिलांनी ४० वर्षांपूर्वी नोकरी केली. तेव्हापासून ते येथे रहात होते; मात्र गेल्या ३-४ दिवसांपासून स्थानिक रहिवासी राकेश सिंह, त्याचा भाऊ नरेंद्र आणि कुटुंबातील इतर सदस्य या मालमत्तेवर दावा करत आहेत.

३. सरकारी कागदपत्रांमध्ये नमूद केल्यानुसार वाहिद अली याने मंदिर नियंत्रणात घेतले. मंदिरात शिवलिंग आणि शिवपरिवाराची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती. हळूहळू येथे मुसलमानांची लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे हिंदूंचा वावर अल्प झाला आणि नंतर पूजाही बंद झाली.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश सरकारने आता अशा मंदिरांच्या शोधासाठी स्वतंत्र विभागच स्थापन करावा, असेच हिंदूंना वाटते !