मंदिरांवर सरकारी नियंत्रण असू नये ! – मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर २०२४

अधिवेशनस्थळी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना श्री. मंगलप्रभात लोढा

नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) : धार्मिक क्षेत्रात राजकारणाचा हस्तक्षेप असणे योग्य नाही. धार्मिक क्षेत्र आणि राजकारण हे वेगवेगळे आहे. सरकारने धार्मिक स्थळे कह्यात घेणे आणि ती नियंत्रित करणे चुकीचे आहे.

मंदिरांवर सरकारी नियंत्रण असू नये, असे मत भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. १८ डिसेंबर या दिवशी येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी पत्रकारांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना मंगलप्रभात लोढा यांनी वरील मत व्यक्त केले.