बांगलादेश फाळणीच्या वेळच्या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ प्रमाणपत्र मिळावे ! – आमदार राजकुमार बडोले, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष १९७०-७१ मध्ये बांगलादेशाच्या फाळणीच्या वेळी तेथील निर्वािसत हिंदू भारतात आले. त्यातील काही हिंदू गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आले आहेत. या निर्वासित हिंदूंना ‘अनुसूचित जातीच्या सवलती प्राप्त व्हाव्यात, यासाठी वर्ष २०१६-१७ मध्ये त्यांचे सर्वेक्षणही झाले आहे. बांगलादेशातील या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्रामध्ये केली.