विधान परिषद सभापतीपदाची संधी मिळाली; जनतेला न्याय देणार ! – प्रा. राम शिंदे, भाजप
नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – मंत्री पदासाठी माझ्या नावाची चर्चा असतांना मला सभापतीपदाची संधी भाजपकडून मिळाली आहे. अनेक वेळा काही पदे मिळत असतात, तर काही पदे न मागता मिळत असतात; मात्र आता सभापती म्हणून राज्यातील जनतेला कसा न्याय दिला जाईल ? यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी १८ डिसेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केल्यानंतर ते बोलत होते. आवेदन करावयाच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ एकच आवेदन आले. १९ डिसेंबर या दिवशी त्यांच्या निवडीची घोषणा होईल.