शेतकर्‍यांना दिलासा न देणार्‍या विमा आस्थापन अधिकार्‍यांना कारागृहात टाका ! – रोहित पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष

रोहित पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष

नागपूर – सांगली जिल्ह्यातील विमा आस्थापन कामाविषयी अनेक तक्रारी आहेत. शेतकर्‍यांना दिलासा न देणार्‍या विमाआस्थापन अधिकार्‍यांना येरवडा कारागृहात टाका, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत केली. राज्यपाल अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेच्या प्रसंगी रोहित पाटील यांनी ही मागणी केली.

आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘‘नाशिकनंतर सांगली ही द्राक्ष उत्पादकांची राजधानी आहे. असे असतांनाही येथे पिकाला अपेक्षित दर मिळत नाही. पीकहानीचे पंचनामे झाले; पण एक पैसाही उत्पादकांना मिळाला नाही. या संदर्भात शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही.’’