(म्हणे) ‘आम्ही भारताशी भक्कम संबंध निर्माण केले, ट्रम्प सरकारही ते कायम ठेवेल, अशी आशा !’ – Statement Of Biden Administration
अमेरिकेतील बायडेन सरकारचे विधान
वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही उद्योग, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रांत भारताशी संबंध प्रस्थापित करून ते सर्वांत भक्कम स्थितीत नेले आहेत. आम्हाला आशा आहे की, डॉनल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षतेच्या काळातही हे भक्कम रहातील, असे विधान अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सरकारमधील उप परराष्ट्रमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी केले.
संपादकीय भूमिकाबायडेन प्रशासनाने भारताशी भक्कम संबंध निर्माण करण्याच्या नावाखाली भारताचे पाय खेचण्याचा आणि विश्वासघात करण्याचाच अधिक प्रयत्न केला आहे. असे करून वर स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे ! |