जॉर्जिया राष्ट्रहिताला प्राधान्य देणार ! – Georgia’s New President Mikheil Kavelashvili
टबलिसी – जॉर्जियाला युरोपियन युनियनचे सदस्यत्व हवे आहे. देशातील नागरिकांची तशी इच्छा आहे. असे असले, तरी राष्ट्रहिताला प्राधान्य देणेही आवश्यक आहे, असे वक्तव्य जॉर्जियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मिखाइल कोवेलाशविली यांनी केले. सत्तेत आलेल्या जॉर्जियन ड्रीम पार्टीने युरोपियन युनियलनमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय वर्ष २०२८ पर्यंत पुढे ढकलला होता. त्या पार्श्वभूमीवर कोवेलाशविली यांनी हे वक्तव्य केले. या वेळी नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी युरोपियन युनियनच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. ‘काही घटनांमध्ये युरोपियन युनियन संघटना आमचा अवमान करते आणि बर्याच वेळा ती आमच्याशी अयोग्य पद्धतीने वागते. युरोपियन युनियन आणि जॉर्जिया यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी आम्ही या सूत्राकडे संघटनेचे लक्ष वेधू इच्छितो.’’