Another Temple Found In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात मुसलमानबहुल भागात आणखी एक बंद असलेले मंदिर सापडले !
मंदिर भग्नावस्थेत असून धर्मांध मुसलमानांनी मंदिरांतील मूर्तींची केली आहे तोडफोड !
संभल (उत्तरप्रदेश) – संभलमध्ये गेल्या ३ दिवसांत अनेक वर्षे बंद असणारी २ मंदिरे सापडल्यानंतर आता याच जिल्ह्यातील चंदौसी शहराच्या लक्ष्मणगंज या १०० टक्के मुसलमानबहुल भागात बांकेबिहारी मंदिर सापडले आहे. हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे. हिंदूंच्या पलायनानंतर वर्ष २०१० मध्ये धर्मांध मुसलमानांनी मूर्तींची तोडफोड केली.
१. लक्ष्मणगंज येथे २५ वर्षांपूर्वीपर्यंत हिंदूंची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती; परंतु हळूहळू येथे मुसलमानांची लोकसंख्या वाढत गेली. यानंतर हिंदूंचे स्थलांतर चालू झाले आणि त्याचा परिणाम येथे असलेल्या १५२ वर्षांच्या बांकेबिहारी मंदिरावर झाला. कधीकाळी या मंदिरात सकाळ-संध्याकाळ पूजा होत असे. हिंदू दर्शनासाठी येत असत.
२. मंदिराचे संरक्षक कृष्ण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१० पर्यंत मंदिरात पूजा होत होती. यावर्षी धर्मांध मुसलमानांनी भगवान बांकेबिहारी यांची मूर्ती आणि मंदिरातील शिवलिंग यांसह इतर मूर्तींची नासधूस केली. पोलिसांनी कारवाईही केली; मात्र मंदिराकडे लक्ष दिले गेले नाही. हळूहळू मंदिराचे दरवाजे, शिखर वगैरे तुटले. मंदिर पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. इथे मंदिरात मूर्तींऐवजी त्यांच्या खुणा दिसतात.
संपादकीय भूमिकाइतर राज्यांतही मुसलमानबहुल भागांत मंदिरे शोधण्याची मोहीम राबवणे आवश्यक झाले आहे ! यासाठी हिंदु संघटनांनी स्थानिक सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे ! |