भारत ‘बांगलादेशी घुसखोरमुक्त’ करावा ! – आमदार तमिळ सेल्वन, भाजप
नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – मागील २ महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे मागील २ महिन्यांत बांगलादेशातील २ सहस्र कुटुंबांना घरदार सोडून निघून जावे लागले. हिंदुमुक्त बांगलादेश करण्याचा त्यांचा डाव आहे. भारतात मात्र घुसखोर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात रहात आहेत. त्यांच्याकडे भारतीय ओळखपत्र नाही. हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशाला धडा शिकवण्यासाठी भारत बांगलादेशी घुसखोरमुक्त करावा, असे आवाहन भाजपचे तमिळ सेल्वन यांनी विधानसभेत केले. १७ डिसेंबर या दिवशी औचित्याच्या सूत्रावर ते बोलत होते.