वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या हस्‍ते झालेल्‍या ध्‍वजपूजनाच्‍या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘२३.६.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने महर्षींच्‍या आज्ञेने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजपूजन झाले. त्‍या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ध्‍वजपूजन होण्‍यापूर्वी माझ्‍या मनात अनेक विचार येत होते; मात्र मी ध्‍वजपूजनाच्‍या ठिकाणी जाताच माझे मन स्‍थिर आणि शांत झाले. मी निर्विचार स्‍थिती अनुभवत होते. ‘मला एवढ्या सात्त्विक वातावरणात उपस्‍थित रहाण्‍याची संधी मिळाली’, या विचारानेच मला गुरुदेवांप्रती (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती) कृतज्ञता वाटत होती आणि माझा भाव जागृत होत होता.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ध्‍वज जसा हळूहळू वर खेचू लागल्‍या, तसतसे गुरुदेवांचे प्रकाशमय तत्त्व (त्‍यांचे चरण) मला विराट रूपात दिसले. तेव्‍हा संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाश पसरत होता.

सौ. वैदेही पेठकर

३. ‘माझ्‍या हृदयमंदिरात आणि बाहेरही सर्वत्र केवळ गुरुदेवच आहेत’, असे मला अनुभवायला आले आणि माझी भावजागृती झाली.

‘हे गुरुदेवा, मी आपल्‍यामधील चैतन्‍याचे दिव्‍य क्षण अनुभवू शकले’, त्‍याबद्दल आपल्‍या कोमल श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वैदेही विवेक पेठकर, ग्‍वाल्‍हेर, मध्‍यप्रदेश.  (२८.८.२०२४ )

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक