बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात विद्यार्थी आणि पालक यांचा पणजीत मोर्चा
पणजी, १७ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी डॉ. के.बी. हेडगेवार विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांचे विद्यार्थी अन् पालक यांनी पणजी शहरातून मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थ्यांनी हातात बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात माहिती असलेले फलक घेतले होते. ‘बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार हे मानवतेच्या विरोधातील अत्याचार आहेत. आणि यासंबंधी तत्परतेने प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे’, असे मत या वेळी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी व्यक्त केले.