संपूर्ण शरणागती साधणे हे मनुष्‍यजन्‍माचे साध्‍य होय !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘मनुष्‍यजन्‍मास येऊन साधायचे काय ?’, या प्रश्‍नाला उत्तर देतांना श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) म्‍हणाले, ‘सध्‍या तुम्‍ही मनाचे ताबेदार आहात. भगवंताची भक्‍ती करून मन तुमचे ताबेदार व्‍हायला पाहिजे. त्‍याने मनावर पूर्ण स्‍वामित्‍व येईल, ही स्‍थिती प्राप्‍त करून घेण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवावे. मनावर स्‍वामित्‍व येऊनसुद्धा भागत नाही. त्‍याच्‍याही पुढे जावे लागते. संपूर्ण मनोलय (मनोनाश) ही अवस्‍था प्राप्‍त व्‍हावी लागते. तीच ‘ न मन’ अवस्‍था होय. त्‍यासाठी ‘नमन’ हा एकच उपाय आहे. नमन याचा अर्थ भगवंताला किंवा सद़्‍गुरुला संपूर्ण शरण जाणे.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)