चिन्मय कृष्णदास यांची सुटका, बांगलादेशी हिंदू यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती
निपाणी (कर्नाटक) – चिन्मय कृष्णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंचे रक्षण यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने निपाणी तहसीलदार मुज्जफर बाळीगार यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या वेळी ‘श्रीरामसेना कर्नाटक’चे निपाणी तालुकाप्रमुख श्री. बबन निर्मळे, श्रीराम सेना कर्नाटकचे श्री. अमोल चेंडके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निगोंडा पाटील आणि श्री. अनिल बुडके, सनातन संस्थेचे श्री. अशोक नाईक, हिंदुत्वनिष्ठ श्री. संतोष मोरे, श्रीराम सेनेचे श्री. दीपक बुदीहाळे, श्री. अविराज शहा, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेश आवटे, ‘हिंदू हेल्प लाईन निपाणी’चे श्री. सागर श्रीखंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सचिन चौगुले आणि श्री. शिवगोंडा पाटील यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.